Ad will apear here
Next
कोट्यधीश बनवणारी पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आजही म्युच्युअल फंड, शेअर्सपेक्षाही मुदत ठेवी, प्रॉव्हिडंट फंड, पोस्टातल्या बचत योजना अशा गुंतवणूक योजना सुरक्षित व आपल्याशा वाटतात. पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना ही त्यापैकीच एक. नियमित आणि सातत्याने गुंतवणूक केल्यास कोट्यधीश बनवणारी ही योजना आहे. त्याविषयी...
.....  


छोटे गुंतवणूकदार तसंच आपल्या बचतीवर निश्चित उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा असणाऱ्यांना पोस्टाच्या विविध योजना आकर्षित करतात. पोस्टाच्या प्रत्येक योजनेचा कालवधी, नियम, व्याजदर वेगळे असल्यामुळे आपल्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार योजनांची निवड करायला हवी. 

पोस्टाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक केल्यास तुम्ही एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. अर्थात गुंतवणुकीतील सातत्य, नियमितपणा आणि व्याजदरातील सातत्यही यासाठी महत्त्वाचे ठरते. कारण पोस्ट ऑफिस योजनांवरचा व्याजदर केंद्र सरकार ठरवतं. शिवाय या व्याजदारांमध्ये वेळोवेळी बदलही केले जातात. पोस्टाच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न झाल्यास पीपीएफ योजनेत दिवसाला ३०० किंवा ४०० रुपये गुंतवणूक करून अनुक्रमे २६.८ आणि २३.५ वर्षांमध्ये एक कोटी रुपये जमा होऊ शकतात.

‘पीपीएफ’ खात्यात मासिक गुंतवणुकीची सोय आहे. यासोबतच १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खातं पुढे सुरू ठेवता येतं. प्रत्येक वेळी पाच वर्षाचा कालावधी वाढवून घेता येतो. 

समजा, तुम्ही पीपीएफ खात्यात दिवसाला ३०० रुपये गुंतवणार असाल, तर वर्षाला एक लाख नऊ हजार ५०० रुपये गुंतवणूक होईल. या योजनेत वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या ‘पीपीएफ’वर वर्षाला ७.९ टक्के दराने व्याज मिळतं. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक केल्यास साधारण २६ वर्षे ८ महिने एवढ्या कालावधीत तुमच्याकडे एक कोटी रुपये जमतील. मात्र, हे खातं तीन वेळा प्रत्येकी पाच वर्ष याप्रमाणे १५ वर्षं वाढवल्याने ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम काढता येईल. 

त्याचप्रमाणे दिवसाला ४०० रुपये गुंतवणार असाल, तर वर्षाला एक लाख ४६ हजार रुपये गुंतवणूक होईल. ७.९ टक्के व्याजदरानुसार २३.५ वर्षांमध्ये एक कोटी रुपये निधी जमेल. हे खातं दहा वर्षांसाठी वाढवण्यात आल्याने २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातली रक्कम काढता येईल. पोस्टाच्या ‘पीपीएफ’वर चक्रवाढ व्याजाचे लाभ मिळतात.

संपूर्ण वर्षाची रक्कम एकत्रित गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पैसे गुंतवल्यास अधिक लाभ मिळू शकतात.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZJECH
Similar Posts
गुंतवणुकीचे संस्कार मुलं नोकरी-व्यवसाय करून स्वतःचे अर्थार्जन करू लागतात त्या वेळी सुरुवातीची चार-पाच वर्षं कमावलेला पैसा चैनीवर उधळतात; मात्र ही चैन पुढे महागात पडते. म्हणूनच बचतीचे संस्कार बालवयापासून करणं, घरातली बचत आणि खर्च या व्यवहारांची त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांना गुंतवणुकीच्या पर्यायाची माहिती देणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत
आर्थिक वर्ष संपत आलंय! अजूनही गुंतवणूक केली नसेल तर ‘हे’ जरूर वाचा! २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष संपायला आता केवळ दीड महिना शिल्लक राहिला आहे. करबचतीसाठी सुरुवातीपासून गुंतवणूक करणं चांगलं असलं, तरी लाखो भारतीय आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दोन-तीन महिन्यांमध्ये बचत करतात. विविध पर्याय बारकाईने तपासून पाहिल्यास आणि त्यांचा तौलनिक अभ्यास केल्यास गुंतवणुकीला नेमका अर्थ प्राप्त होतो
स्वीप इन किंवा मल्टिप्लायर अकाउंट म्हणजे काय ? बँकांमध्ये विविध प्रकारची बचत खाती उघडता येतात. सर्वसाधारण बचत खाते, नो फ्रिल्स खाते, सॅलरी अकाउंट, प्रिव्हिलेज बँक खाते, तसेच लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीही वेगळ्या बचत खात्यांची सोय असते. यासोबतच स्वीप इन किंवा मल्टिप्लायर अकाउंट हा एक प्रकार असतो. स्वीप इन किंवा मल्टिप्लायर या प्रकारच्या
गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस लग्नकार्य, मोठी खरेदी अथवा खर्च, यासाठी माणूस मिळकतीमधील थोडे पैसे बाजूला ठेवत असतो. यालाच बचत म्हणतात; पण गुंतवणूक आणि बचत यात फरक आहे. याबाबतच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी देवदत्त धनोकर यांनी ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र’ हे पुस्तक लिहिले आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून आर्थिक उद्दिष्ट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language